विहार : शालेय / सहशालेय उपक्रम
स्वागत समारंभ
दरवर्षी शाळेचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा होतो. या दिवशी शाळा सजवली जाते. मुलांचे औक्षण करून व गुलाबपुष्प देऊन स्वागत केले जाते. यासाठी संस्थेचे सदस्य व इतर मान्यवर उपस्थित राहतात.
सामुदायिक वाढदिवस समारंभ
आपला वाढदिवस शाळेतही साजरा होतो याचा आनंद मुलांना मिळावा तसेच त्यानिमित्ताने मुलांची आई शाळेत येऊन मुलांविषयी प्रगती जाणून घेतील या उद्देशाने आमच्या मोठ्या बाईंनी हा सामुदायिक वाढदिवस समारंभ शाळेत सुरु केला. ही परंपरा आजही विहारमध्ये सुरु आहे आणि ती सुरु राहणारच आहे.
विविध सभांचे आयोजन (उदा.माता-पालक सभा, व्यवस्थापन समिती सभा)
विहारमध्ये वेळोवेळी विविध सभांचे आयोजन केले जाते. यामध्ये विहारमधील प्रगतीबाबत, शासनाने सांगितलेल्या विविध योजना संदर्भात चर्चा करून निर्णय घेतले जातात.
हळदीकुंकू समारंभ
माता पालकांसाठी श्रावणी शुक्रवार, मातृ दिन अशा निमित्ताने हळदी-कुंकू समारंभ आयोजित केला जातो. या निमित्ताने वेगवेगळे तज्ज्ञ बोलावून मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य, इ. विषयांवर मार्गदर्शन केले जाते.
शैक्षणिक सहल
सहशालेय उपक्रम म्हणून दरवर्षी विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल आयोजित केली जाते. मुलांना ऐतिहासिक गोष्टींची माहिती व्हावी, त्यांसंबंधी प्रत्यक्ष ज्ञान मिळावे, तसेच मित्रांबरोबर प्रवासाचा अनुभव घेता यावा, स्वावलंबन यासाठी दरवर्षी मोठ्या शिशुवर्गाच्या शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाते. या सहलीचे सुयोग्य नियोजन करून ती यशस्वीपणे पूर्ण केली जाते.
सांस्कृतिक कार्यक्रम
दरवर्षी विहारमध्ये विद्यार्थ्यांचे विविध सण, स्नेहसंमेलन या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. गणेशोत्सवामध्ये प्रत्येक वर्गाचे वेगवेगळे कार्यक्रम होतात. यामध्ये मुले सामुहिक व वैयक्तिक कार्यक्रम सादर करतात.
स्नेहसंमेलन
दरवर्षी विद्यार्थ्यांच्या गुणांचे कौतुक करण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी पाहुण्यांना निमंत्रित केले जाते.
स्नेहसंमेलात सांस्कृतिक कार्यक्रमही असतात. विहारच्या वर्गांचे स्वतंत्र कार्यक्रम साजरे होतात. यात विविध प्रकारचे नृत्य, ऐतिहासिक नाटके, यांचे अप्रतिम सादरीकरण विद्यार्थी करतात. स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम चार दिवस चालतो.
सण व उत्सव
विद्यार्थ्यांमध्ये आपली संस्कृती रुजावी तसेच धार्मिक सणांचे महत्त्व कळावे त्याचबरोबर त्या सणांमागील धार्मिक व वैज्ञानिक कारण लक्षात यावे यासाठी नागपंचमी, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, हादगा यांसारखे धार्मिक सण साजरे केले जातात.
माँटेसरी दिन
दरवर्षी ३१ ऑगस्ट हा माँटेसरी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मुलांना खाऊचे वाटप करण्यात येते.
कै.कुसुमताई रामचंद्र आराध्ये स्मृती दिन
दरवर्षी २२ सप्टेंबर हा कै.कुसुमताई रामचंद्र आराध्ये यांचा स्मृती दिन साजरा केला जातो. या दिवशी शैक्षणिक साहित्यांचे प्रदर्शन मांडले जाते व पालकांसाठी निमंत्रितांचे व्याख्यान आयोजित केले जाते.
स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन
वरील राष्ट्रीय सण मोठ्या दिमाखात विविहारमध्ये साजरे केले जातात. या दिवशी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. तसेच राष्ट्रगीत, राज्यगीत, व समूहगीतांचे तालासुरात गायन होते.
निरोप समारंभ
दरवर्षी मोठ्या गटाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ साजरा केला जातो. विद्यार्थ्यांना खाऊ दिला जातो. कार्यक्रमाचे आयोजन करून त्यात विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त करतात.