देणगी देणग्यांसाठी आवाहन !
शिशुविहार
प्रिय देणगीदारांनो,
शिशु विहार ही एक विनाअनुदानित खाजगी शाळा आहे. जी 'ज्ञानदीप लावू जगी' या बोधवाक्यासह कार्यरत आहे. शिशु विहार ही एक प्रयोगशील व माँटेसरी तत्वावर चालणारी शाळा आहे. ती कोणतीही सरकारी मदत स्वीकारत नाही. समाजातील उदार व्यक्तीचे दयाळु योगदान, आमच्या उपक्रमांना सुरळीतपणे पार पाडण्यास मदत करते. म्हणून आम्ही देणग्यांसाठी हे आवाहन करत आहोत. तुम्ही कोणत्याही अटीशिवाय किंवा खालील कारणांसाठी रक्कम दान करू शकता. जर तुम्हाला इतर कोणत्याही कारणासाठी देणगी द्यायची असेल तर कृपया कार्यालयाशी संपर्क साधावा.
ऑनलाईन / ऑफलाईन देणगी :
(ऑनलाइन देणगी म्हणजे नेट बँकिंगद्वारे देयके देणे)
(ऑफलाईन देणगी म्हणजे चेक / डीडी / रोख इत्यादीद्वारे देयके देणे)
१) कॉर्पस फंड : प्रशालेच्या दैनंदिन सुरळीत कामकाजासाठी अंदाजे दहा कोटी रुपयांचा कॉर्पस फंड आवश्यक आहे.
२) विकास निधी : नवीन पायाभूत सुविधा करण्यासाठी अंदाजे दहा कोटी रुपयांचा खर्च येईल.
३) शिक्षण - विहारची / कोविड-१९ची तुट
कोविड -१९ महामारीमुळे प्रशालेच्या उत्पन्नात तुट आल्यामुळे हे प्रामुख्याने शुल्क वसुलीत घट झाल्यामुळे आपणास देणगी देण्याची विनंती आहे.
वरील कारणासाठी तुम्ही देणगी देऊ शकता.
प्राथमिक
प्रिय देणगीदारांनो,
आदर्श प्राथमिक विद्यालय एक अनुदानित शाळा आहे. 'ज्ञानदीप लावू जगी' या बोधवाक्यासह ती कायम कार्यरत असते. आदर्श प्राथमिक शाळा नेहमी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्नशील असते. शाळा विद्यार्थ्यांना केवळ बौद्धिकच नव्हे तर इतर भौतिक सुविधा देण्यासाठी प्रयत्न करत असते. अशा सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक गरज असते. शासनाकडून फक्त शिक्षकांचे पगार दिले जातात. इतर गरजा पूर्ण करण्यासाठी देणग्यांची गरज भासत असते. ती गरज आपल्या सारख्या दानशूर देणगीदारांकडून पूर्ण होते त्यासाठी तुम्ही कोणत्याही अटीशिवाय किंवा खालील कारणांसाठी रक्कम दान करू शकता. तुम्हाला इतर कोणत्याही कारणाने देणगी द्यायची असेल तर कृपया विद्यालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा
ऑनलाईन / ऑफलाईन देणगी :
(ऑनलाइन देणगी म्हणजे नेट बँकिंगद्वारे देयके देणे)
(ऑफलाईन देणगी म्हणजे चेक / डीडी / रोख इत्यादीद्वारे देयके देणे)
१) बांधकाम निधी -
२) इमारत निधी -
३) मालमत्ता खरेदी (संगणक / प्रोजेक्टर) -
४) परसबाग निर्मिती खर्च -
५) आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थी शिष्यवृत्ती -
६) स्मृती शिष्यवृत्ती -
७) गुणगौरव शिष्यवृत्ती -
८) क्रीडा विषयक शिष्यवृत्ती -
९) विकास निधी -
१०) वंचित विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती -
११) गुणी / होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती -