प्रवेशोत्सव
नर्सरी व शिशुविहार
शिशु विहार ही एक पूर्व प्राथमिक शाळा आहे. नर्सरी व छोटा गट प्रवेश प्रक्रियेची सुरुवात साधारणपणे मार्च महिन्यात होते. प्रत्यक्ष्य मुल पाहुनच इथे प्रवेश दिला जातो.
आमच्या शाळेत आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करण्यासाठी आपल्याला ऑनलाइन प्रवेश अर्ज भरावा लागेल. हा अर्ज मराठी भाषेतच भरावा.
कृपया लक्षात ठेवा की तुम्हाला एकाच शैक्षणिक वर्षात एकापेक्षा जास्त वेळा प्रवेश अर्ज भरण्यास परवानगी नाही. अर्जात दिलेल्या माहितीमध्ये कोणतीही तफावत आढळल्यास शाळा कोणतीही पूर्वसूचना न देता प्रवेश रद्द करू शकते. हा पूर्ण अधिकार शाळेला राहील.
प्रवेश प्रक्रियेच्या माहितीसाठी आणि फॉर्म भरण्यासाठी शाळेच्या वेबसाईटवर जावून नवीन अर्ज भरून खाली दिलेल्या लिंक्स वर जावून शाळेत प्रवेश कसा मिळेल? हे पाहावे.
महत्वाची टीप
नर्सरी वर्ग प्रवेशासाठी शैक्षणिक वर्ष २०२५ - २६ साठी शासन निर्णयानुसार ज्यांचा जन्म दिनांक १ जानेवारी २०२२ पासून दि. ३१ डिसेंबर २०२२ पर्यंतच्या काळातील आहे त्यांनाच अर्ज भरता येईल.
छोटा शिशु वर्ग प्रवेशासाठी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी शासन निर्णयानुसार ज्यांचा जन्म दिनांक 1 ओक्टोंबर २०२० पासून दिनांक ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत आहे त्यांनाच अर्ज भरता येईल.
प्राथमिक
इयत्ता पहिली ते चौथी प्रवेश प्रक्रिया
आदर्श शिक्षण मंडळी संचालित आदर्श प्राथमिक विद्यालय ही सोलापूर जिल्ह्यातील एक नामांकित शाळा आहे. कै कुसुमताई आराध्ये यांनी नावारुपाला आणलेल्या आमच्या शाळेत नर्सरी (बालवाटिका), छोटा शिशुवर्ग आणि मोठा शिशुवर्ग असे पूर्व प्राथमिक वर्ग आहेत तर पहिली ते पाचवी असे प्राथमिक वर्ग आहेत.
आमच्या शिशुविहार मधील विद्यार्थ्यांना प्राधान्याने विद्यालयात प्रवेश दिला जातो. साधारणपणे एप्रिल महिन्यात मोठ्या गटाचा वार्षिक निकाल झाल्यावर इयत्ता पहिलीचा प्रवेश अर्ज शाळेत्च ऑफलाईन पद्धतीने भरुन प्रवेश दिला जातो.
तसेच ज्यांना इयत्ता पहिलीत प्रवेश घ्यावयाचा आहे अशा विद्यार्थ्यांना जून च्या पहिल्या आठवड्यात इ.पहिलीचा ऑफलाईन अर्ज भरुन (जागा शिल्लक असेल तर) प्रवेश दिला जातो. या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची आनंददायी पद्धतीने छोटी मुलाखत घेतली जाते. त्यामध्ये त्याची समाधानकारक प्रगती असेल तर प्रवेश दिला जातो
इयत्ता पाचवी प्रवेश प्रक्रिया
इयत्ता पाचवीच्या प्रवेशासाठी प्रवेश अर्ज संस्थेच्या संकेत स्थळावर दिलेल्या मुदतीत भरता येईल. मार्च-एप्रिल महिन्यात त्यासंबंधी पूर्वसूचना दिली जाते. तसेच ऑफलाईन अर्ज ही भरता येईल. नंतर सूचनेनुसार सांगितलेल्या दिवशी अर्ज शाळेत (कार्यालयात) जमा करावे.