ज्ञानदीप लावू जगी !

(डॉ.मादाम माँटेसरी)
शिक्षण म्हणजे मनुष्याच्या आयुष्यातील बहुमोल गोष्ट आहे. शिक्षणाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. शिक्षणाच्या नवनवीन पद्धती अंमलात येत आहेत पण हे सर्व शिक्षणाच्या क्षेत्रांतील विचार प्राथमिक शिक्षणासून सुरू करतात. त्यांतच नवीन नवीन बदल मनुष्य करीत आहे.
"स्वतः समोर निर्माण झालेल्या प्रश्नांशी तनमन लावून झगडण्याची आणि स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवून घेण्याची, मनाची स्वावलंबनशील वृत्ति, ज्या पद्धतीमुळे विकसित होते तिचे नांव बालमंदिराची शिक्षण पद्धती."
शिक्षणाची जननी या विशिष्ट पण अगत्याच्या शिक्षणासंबंधी डॉ.मादाम माँटेसरीने नवीन पद्धत सुरु केली. यापूर्वी फ्रोबेलसारख्या शास्त्रज्ञांनीच या बाबतीत संशोधन - प्रयोग केले होते. त्याच विचारसरणीचा शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करुन मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि तो बऱ्याच अंशी सफल झालेला आपण पहातो आणि हीच ती बाल अध्यापन पद्धत होय.
लहान मुलच पुढे उत्तम नागरीक बनत असतो त्यामुळेच या बालवृक्षाचा पाया चांगला घातला जाऊन त्याला मार्गदर्शनाच्या प्रेमळ वातावरणाचे खत घातले गेल्यास आजचा प्रत्येक बालक चांगला निपजेल यात शंका ती काय?
त्याच अनुषंगाने कुसुमताई आराध्ये यांच्या कुशल नेतृत्वाखाली शाळेने अल्पावधीतच नावलैकिक मिळवला. विद्यार्थीसंख्या वाढू लागली. शाळेचे शेकडो विद्यार्थी स्कॉलरशीप परिक्षेच्या राज्य आणि जिल्हा गुणवत्ता यादीत चमकु लागले. शालेय, सहशालेय उपक्रम, क्रीडास्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा परीक्षांमध्ये आदर्शच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले. शिस्त, संस्कार आणि आदर्शाचा अट्टाहास असल्यामुळे 'आदर्श' चे विद्यार्थी सर्व क्षेत्रात अग्रेसर ठरले. कुसुमताई स्वतः उच्चविद्याविभूषित, शिक्षणतज्ञ, संगीतप्रेमी आणि उत्तम व्हायोलीन वादक होत्या.
आज शाळेची सुसज्ज इमारत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी 'आदर्श शिक्षण मंडळी, पंढरपूर' या संस्थेच्या स्वतःच्या जागेत मोठ्या डौलाने उभी आहे. हवेशीर मोठ्या वर्गखोल्या, प्रशस्त मैदान, भव्य कलामंच, सुसज्ज डिजिटल कॉन्फरन्स हॉल, ग्रंथालय, प्रयोगशाळा, पिण्यासाठी आर.ओ.वॉटर प्युरिफायर, विद्यार्थीसंख्येच्या प्रमाणात स्वच्छ प्रसाधनगृहे अशा सर्व भौतिक सोयीसुविधांनी युक्त अशी ही शाळा प्रगतीपथावर आहे. शाळेत शासनमान्य तज्ज्ञ, अनुभवी शिक्षकवृंद शाळेच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र शासनाच्या 'प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र' आणि 'शाळासिध्दी' कार्यक्रमात शाळा 'अ' श्रेणीमध्ये आहे. अर्थात शाळेच्या प्रगतीमध्ये आमच्या पालकवर्गाचे प्रेम आणि सहकार्य आहेच आहे!
मा. पंतप्रधानांच्या डिजिटल क्रांतीला प्रतिसाद देत आम्ही यावर्षी विद्यार्थ्यांसाठी प्रोजेक्टर, स्मार्ट टी.व्ही., संगणक आणि इंटरनेट सुविधा तसेच ऑडिओ-व्हिडिओ शैक्षणिक साहित्याची परिपूर्ती करत आहोत.
नवीन अभ्यासक्रमाला अनुसरून वेगवेगळे उपक्रम राबवत आहोत. यामधून बालके संस्कारक्षम कसे होतील याकडे लक्ष केंद्रीत करत आहोत. "लावियेला दीप तो हा तेवता ठेवू चला । बालकांच्या उन्नतीचा मार्ग हा चालू चला ॥"
मा.श्री.सतीश प्रभाकर पुरंदरे
अध्यक्ष - आदर्श शिक्षण मंडळी, पंढरपूर.