भौतिक सुविधा व वैशिष्ट्ये


सुसज्ज इमारत

शाळेची इमारत सुसज्ज, प्रशस्त हवेशीर व सर्वबाजूंनी प्रकाश येईल अशी आहे. वि‌द्यालय व शिशुविहार यासाठी स्वतंत्र्य इमारती आहे. इमारतीत प्राथमिकचे १६ वर्ग, ग्रंथालय, हॉल व कार्यालय असे स्वतंत्र विभाग आहेत. सर्व वर्ग प्रशस्त व हवेशीर आहेत. वर्गामध्ये पंखे, लाईट, टेबल, खुर्ची कपाट सतरंज्या इ.सोयी सुविधा आहेत, तसेच रॅम्पची देखील सोय इमारतीत आहे. आजूबाजूला वेगवेगळी झाडे आहेत त्यामुळे इमारत, सुंदर व आकर्षक दिसते.

प्रशस्त क्रीडागंण

इमारतीच्या आतमध्ये प्रशस्त क्रीडागंण आहे. जवळजवळ २००० विद्‌यार्थी या पटांगणावर एका वेळी ओळीत उभे राहू शकतात. वि‌द्यार्थी पटांगणावर मनसोक्त खेळ खेळतात, तसेच पटांगणावर चार ही बाजूनी झाडे, हिरवळ, फुलझाडे आहेत. झाडांची सावली मुबलक प्रमाणात पटांगणावर पडते. झाडांमुळे इमारतीची शोभा खूप वाढली आहे.

भव्य कलामंच

शाळेत मैदानावर समोरच भव्य असा कलामंच आहे. वार्षिक स्नेहसंमेलन, बक्षीस समरंभ असे सर्व कार्यक्रम या कलामंचावर मोठ्या दिमाखात पार पाडले जातात.

डिजिटल कॉन्फरन्स हॉल

शाळेत सभेसाठी डिजिटल सोय असणारा हॉल आहे. यामध्ये प्रोजेक्टर संगणक इ. सोयी आहेत.

प्रोजेक्टर

वि‌द्यार्थ्यांसाठी विविध चित्रफिती दाखवण्यासाठी प्रोजेक्टरची सोय आहे.

स्मार्ट टी.व्ही

विद्यालयाच्या १६ वर्गखोल्यातून, १६ स्मार्ट टी.व्ही. आहेत, त्यांचेवर इंटरनेटच्या माध्यमाद्वारे अभ्यासातील विविध संकल्पना स्पष्ट करून विद्यार्थ्यांना दाखवल्या जातात.

संगणक व इंटरनेट सुविधा

शाळेत संगणक व इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. इंटरनेटच्या माध्यमाद्वारे डिजिटल कॉन्फरन्स हॉलमध्ये अभ्यासातील आणि इतर विविध संकल्पना दाखवल्या जातात. शालेय सर्व कामे म्हणजे हजेरी पत्रक, रजिस्टर, प्रगती पत्रके, दाखले, बोनाफाईड इ. सर्व कामकाज आता संगणकामार्फत केले जाते. तसेच दोन झेरॉक्स मशीन देखील उपलब्ध आहेत. प्रश्नपत्रिका, दाखले इ शाळेतच छापून घेतले जातात.

मोठ्या हवेशीर वर्गखोल्या

शाळेल १६ वर्गखोल्या असून सर्व वर्ग खोल्या प्रशस्त व हवेशीर आहेत. प्रत्येक वर्गामध्ये स्मार्ट टी.व्ही., लाईट, फळा, पंखे, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सतरंज्या / बेंच इ.सोयी आहेत. प्रत्येक वर्गाबाहेर चप्पल स्टँड आहे. अशा मोकळ्या हवेशीर वातावरणामुळे अध्यापन-अध्ययन प्रक्रिया आनंददायी होण्यास मदत होते.

सुसज्ज ग्रंथालय

शाळेत स्वतंत्र्य ग्रंथालय आहे. सुमारे १०००-१२०० पुस्तके ग्रंथालयात उपलब्ध आहेत. या सर्व पुस्तकांच्या योग्य नोंदी ठेवल्या आहेत. वेळोवळी वि‌द्यार्थ्यांना पुस्तके वाचनासाठी दिली जातात. या पुस्तकांच्या संख्येत दरवर्षी भर पडत आहे.

आर.ओ.वॉटर प्युरिफायर

विद्यार्थ्यांना स्वच्छ व निर्जंतुक पाणी प्यायला मिळावे म्हणून शाळेत सर्वांना पुरेल अशा प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आर.ओ.वॉटर प्युरिफायर बसवले आहेत. त्यांची वेळोवळी स्वच्छता व दुरुस्ती केली जाते.

वि‌द्यार्थी संख्येच्या प्रमाणात स्वच्छ प्रसाधनगृहे

शासनाच्या नियमाप्रमाणे विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात प्रसाधनगृहाची सोय आहे. मुलांचे व मुलींचे स्वतंत्र प्रसाधन गृह आहे. त्यांची वेळोवळी स्वच्छता केली जाते.

शासननिर्णयानुसार सर्व भौतिक सुविधांनी परिपूर्ण इमारत

अशा प्रकारे शासन निर्णयानुसार परिपूर्ण अशी वि‌द्यालयाची इमारत आहे. कोणीही वि‌द्यालयात आल्यावर त्याचे मन प्रसन्न व आनंदी व्हावे अशीच शाळेची इमारत सुंदर आहे.

वैशिष्ट्ये

  • पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीची उज्वल परंपरा
  • डिजिटल क्लासरूम
  • विषयवार शैक्षणिक साहित्य
  • विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष
  • सांस्कृतिक कार्यक्रम
  • विविध स्पर्धांचे आयोजन