इतिहास : शाळेच्या इतिहासातील महत्वाचे टप्पे
सन १९५६
२१ सप्टेंबरला डॉ. कुरुलकर यांच्या बंगल्यात बालशाळा सुरु झाली.
२० ऑक्टोबरला 'शिशु विहार' नामकरण उद्घाटन श्री.ग.वा.जोशी.
सन १९५७
२ फेब्रुवारीला शासकीय मान्यता मिळाली.
२ एप्रिलला आरबुजमॅन्शन (सावरकर पथ - स्टेशन रोड) मध्ये स्थलांतर केले.
सन १९५८
१ जूनला प्राथनिक शाळा सुरु व शासकीय मान्यता मिळाली.
सन १९६०
मे. आदर्श शिक्षण मंडळ, पंढरपूर या संस्थेचे रजिस्ट्रेशन झाले.
सन १९६२
आदर्श प्राथमिक विद्यालय, पंढरपूर स्वतंत्र विभाग सुरु झाला.
सन १९६५
१० ऑक्टोबरला कराड धर्मशाळा, जुन्या बस स्थानका जवळ शाळेचे स्थलांतर केले.
सन १९६९
१० जूनला मुक्ताबाई मठात शाखा सुरु झाली.
सन १९८०
१ जुलैला चंद्रभानगरात शिशु विहार वर्ग सुरु झाला.
सन १९८१
१ जूनला चंद्रभागानगरात विद्यालयाचे वर्ग सुरु झाले.
माजी विद्यार्थी संघटना स्थापना व तिचे स्नेहसंम्मेलन शिशुविहारचा रौप्यमहोत्सव सुरु झाला.
सन १९८२-८३
विद्यालयाचे पंचवीसाव्या वर्षात पदार्पण
सन २००४
शाळेचे भक्ती मार्ग येथील स्वतःचा जागेत स्थलांतर.
सन २००७
विहारचे पन्नासाव्या वर्षात (सुवर्ण महोत्सव) पदार्पण.